Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जय हिंद उर्दू माध्यमिक वि‌द्यालय, लोहारा येथील मानवी हक्क संघटना / पीडित पाच शिक्षक-कर्मचारी वर्ग अन्यायाविरोधात आमरण उपोषण

जय हिंद उर्दू माध्यमिक वि‌द्यालय, लोहारा येथील मानवी हक्क संघटना / पीडित पाच शिक्षक-कर्मचारी वर्ग अन्यायाविरोधात आमरण उपोषण

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

Ankush tv18 news network

Bharti sarwne

Lohara pachora

जय हिंद उर्दू माध्यमिक विद्यालय, लोहारा (ता. पाचोरा, जि. जळगाव) या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक व कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक व अमानुष वर्तन केले जात आहे. यासंदर्भात संबंधित शिक्षक व कर्मचारी यांना न्याय मिळावा यासाठी दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून जळगाव जिल्हा परिषद कार्यालयासमोर पूलाखाली आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात येत आहे.

 

शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे  

1. शाळेतील बेकायदेशीर व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.

2. शिक्षक व कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय मिळावा.

3. शिक्षण विभागाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोर्षीवर एफ.आय.आर. दाखल करावा.

4. चेअरमन, मुख्याध्यापक व त्यांच्या कुटुंबियांकडून चालविल्या जाणाऱ्या नातेवाईकवाद व बेकायदेशीर कारभारास आळा घालावा.

5. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत चाललेला शैक्षणिक नुकसान थांबवावे.

6. बदललेल्या शाळा रेकॉर्ड्स, जी. आर. क्रमांक व दस्तऐवजांवरील चौकशी करून जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

7. या सर्व मागण्यांकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन, दोषींवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. शिक्षक व कर्मचारी वर्गाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे.  हा लढा पूर्णपणे लोकशाही मार्गाने व शांततेत राबविण्यात येणार असून, माध्यमांच्या माध्यमातून   समाजापर्यंत सत्य पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मानवी हक्क संघटना / पीडित पाच  शिक्षक-कर्मचारी वर्ग

जावीद अहमद मोहम्मद नजीर उपशिक्षक – मो.9225761213   . मोहसिन अहमद शेख नईमु‌द्दीन – उपशिक्षक – मो.9579886575,   अजय दिलीप रोकडे  – उपशिक्षक , अकील कमरु‌द्दीन पिंजारी  लिपिक मो. 8459595470  , निलेश प्रकाश पाटील- शिपाई मो. 8055646021

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा