Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » गुन्हयातील फरार आरोपीताचा तब्बल 8 वर्षांनी शोध घेवुन आरोपी कडुन अपहार केलेली एकुण 11 लाख 90 हजार रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत

गुन्हयातील फरार आरोपीताचा तब्बल 8 वर्षांनी शोध घेवुन आरोपी कडुन अपहार केलेली एकुण 11 लाख 90 हजार रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत

Trending Photos

Ankush tv18 news network

Jalgaon

दि. 30/03/2017 रोजी फिर्यादी नामे सचिन वसंतराव भामरे रा. आर एल कॉलनी गांधी नगर जळगाव यांचेपिंप्राळा परीसरातील सोमाणी मार्केट येथील साई ज्वेलर्स या दुकानातील कामगार नामे सुशांत सुनिल कुंडु याने दागिने बनविण्यास दिलेल्या एकुण 30 तोळे वजनाच्या सोन्याचा अपहार करुन त्यांचे मुळ गावी पश्चिम बंगाल येथे पलायन केले होते. त्यावरुन फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन रामानंद नगर पोस्टेस गुरनं 42/2017 भादवि कलम 408,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल इ गालेनंतर आरोपीताचा त्याचे मुळ गावी पोलीसांनी वेळोवेळी शोध घेतला असता तो मिळुन आलेला नव्हता करीता सदरचा गुन्हा हा कायम तपासवर ठेवण्यात आला होता.

गुन्हयाचा तपास :- मा. पोलीस अधीक्षक जळगाव, श्री महेश्वर रेडडी सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते सो जळगाव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे सो, जळगाव भाग जळगाव. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र गुंजाळ व रामानंद नगर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकडुन गुन्हयातील आरोपींचा शोध सुरु होता.

दरम्यान रामानंद नगर पोस्टेचे सपोनि / भुषण कोते यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक शोध कामी रवाना केले असता, सदर आरोपीतास वाराणसी उत्तर प्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले. आरोपी नामे सुशांत सुनिल कुंडु वय-39 रा.नस्कर पारा, संत्रागाच्छी, जिला हावडा, पश्चिम बंगाल यास पोस्टेस हजर करुन दि.13/10/2025 रोजी अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सपोनि भुषण कोते यांनी पुढे सुरु ठेवला असता आरोपीताकडुन कलकत्ता पश्चिम बंगाल येथुन सुमारे 11 लाख 90 हजार रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे.

नमुद गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / भुषण कोते, पोलीस हवालदार जितेंद्र राजपुत, पोलीस नाईक योगेश बारी, अतुल चौधरी, पोशि/ अनिल सोननी, दिपक वंजारी, अशांनी सहभाग घेवुन सुमारे 08 वर्षांपुर्वीचा दाखल गुन्हयातील आरोपी अटक करुन त्याचेकडुन मुददेमाल हस्तगत करण्यास यश आले आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा