ankush tv18 news network
गावठी कट्टा बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केला जेलबंद….
जळगाव जिल्हयांत मा.श्री.डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक सो. जळगाव यांच्या आदेशान्वये अग्निशस्त्र संदर्भात संपुर्ण जिल्हयांत अग्निशस्त्र बाळगणारे इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले.
दि.१०/०२/२०२६ रोजी श्री. राहुल गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, जळगाव शहरात उस्मानिया पार्क शिवाजीनगर, जळगाव भागात मोहम्मद साद अय्युब खान रा. शाहुनगर जळगाव हा त्याच्या मोटरसायकलवर गावठी कट्टा घेऊन दहशत निर्माण करीत आहे. म्हणुन मिळालेल्या बातमी नुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया पार्क परीसरातुन रात्री मोहम्मद साद अय्युब खान वय २१ वर्ष रा. शाहुनगर जळगाव यास उस्मानिया पार्क परीसरातुन ताब्यात घेतले होते. त्याच्याजवळ ०१ गावठी कट्टा व ०३ जिंवत काडतुस मिळुन आले होते. म्हणुन त्यास ताब्यात घेऊन जळगाव शहर पोलीस स्टेशन गु.र.क्रं.३७/२०२६ भारतीय हत्यार कायदा १९५९ कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, त्याची मोटरसायकल व मिळुन आलेला गावठी कट्टा व ०३ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्यास पुढील कारवाईकामी जळगाव शहर पो.स्टे.च्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.श्री.डॉ महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक जळगाव, मा.श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक, जळगाव, मा. श्री. नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग, श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शरद बागल पोलीस उपनिरीक्षक, व सहा फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ/विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बावीस्कर, विलेश सोनवणे, किशोर पाटील, रविंद्र कापडणे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोहवा / सुनिल पाटील जळगाव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.




