Home » क्राइम|महाराष्ट्र » गांजा, भांग , विमल घुटका ,आणि ड्रुग्स जळगावात वाहतूक ? नागरिकांमध्ये चर्चेचा विषय …. नाके बंदी उरली नावाला .?

गांजा, भांग , विमल घुटका ,आणि ड्रुग्स जळगावात वाहतूक ? नागरिकांमध्ये चर्चेचा विषय …. नाके बंदी उरली नावाला .?  

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

गुजराथ राज्य आणि मध्य प्रदेश मधून सरार्स गैर कायदेशी मार्गाने होते

गांजा, भांग , विमल घुटका , आणि ड्रुग्स   जळगावात वाहतूक ?

नागरिकांमध्ये चर्चेचा विषय   ……नाके बंदी उरली नावाला .?  

८ किलो १३० ग्रॅम गांजा सहीत दोन आरोपी स्थानीक गुन्हे शाखा जळगाव कडुन जेरबंद………

जळगाव जिल्हयात वाढत्या अंमली पदार्थ तस्करी व वाढत्या अंमली पदार्थाचे सेवन या अनुशंगाने मा.डॉ.श्री. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर सो. अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग तसेच मा.श्री. आण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी सो. चोपडा उपविभाग यांनी श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.

दि.२०/०७/२०२५ रोजी रात्री ०८.३० वाजताच्या सुमारास स्थानीक गुन्हे शाखेचे पोहवा रविंद्र अभिमन पाटील यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली की, दोन इसम आरोपींची नावे:-
1. उदयभान संजय पाटील वय 21 वर्ष रा.चांग्या निमजवळ अडावद ता.चोपडा जि. जळगाव
2. योगेश रामचंद्र महाजन वय 21 वर्ष रा.खालचा माळीवाडा अडावद ता. चोपडा जि. जळगाव  काळया रंगाच्या बजाज पल्सर मोटारसायकलवर गलंगी गावाकडुन चोपडा शहराकडे अवैधररित्या गांजासदृश अंमली पदार्थाची बेकायदेशीरपणे वाहतुक करीत आहेत. त्यावरुन पोहवा विष्णु बिन्हाडे, रविंद्र पाटील व दिपक माळी यांनी नमुद वर्णनाच्या इसमांवर गलंगी गावात पाळत ठेवली त्यानंतर पोउपनिरी जितेंद्र वल्टे व पोहवा विलेश सोनवणे, यांनी चोपडा शहरात आरोपी येत असलेल्या रस्त्यावर पाळत ठेवली सदरचे आरोपींना गलंगी गावात पोलीसांनी पाळत ठेवल्याचे लक्षात येताच ते चोपडा शहराकडे भरधाव वेगाने त्यांच्याकडील बजाज पल्सर मोटारसायकलने निघाले त्यांचा पाठलाग पोहवा विष्णु बिन्हाडे, रवी पाटील, दिपक माळी हे करीत होते. परंतु त्यांचा वेग जास्त असल्याने पोलीस पथकाने सदरची माहीती पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांना दिली पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांनी विलेश सोनवणे यांच्या व स्थानीक नागरींकाच्या मदतीन चोपडा शहरात नाकाबंदी लावुन, नमुद आरोपीतांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, मोटरसायकलवर मागे बसलेला इसम हा उडी मारुन पळुन गेला. त्याचा जवळपास १५० ते २०० मीटर अंतर धावत पाठलाग करुन, पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांनी त्यास पळुन जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले. नमुद इसमाकडुन ९०,०००/- रुपये किंमतीची एक बजाज पल्सर काळया रंगाची MH१८BW८०३५ क्रंमाकाची मोटारसायकल तसेच १,२१,९५०/- रुपये किंमतीचा ८.१३० कि.ग्रॅ. वजनाचा गांजा तसेच ५१,०००/- रुपये किंमतीचे ०२ मोबाईल असा २,६२,९५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असुन, चोपडा शहर पोलीस स्टेशन CCTNS गु.र.क्रं. ४४७/२०२५ NDPS १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २० (ब) (ii), २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा.डॉ.श्री. महेश्वर रेड्डी सो., पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर सो. अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग तसेच मा.श्री. आण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी सो. चोपडा उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, श्री मधुकर साळवे पोलीस निरीक्षक, श्री एकनाथ भिसे सहायक पोलीस निरीक्षक चोपडा शहर पोलीस स्टेशन, पोउपनिरी जितेंद्र वल्टे, पोहवा विष्णु बिन्हाडे, रवी पाटील, दिपक माळी, विलेश सोनवणे चालक दिपक चौधरी सर्व नेम. स्थानीक गुन्हे शाखा जळगाव, पोको मदन पावरा, महेंद्र पाटील, अतुल मोरे नेम, चोपडा शहर पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा