Ankush tv18 news network
रावेर/प्रतिनिधी.. दि.17 विनायक जहुरे
रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथे महिलांचा एल्गार जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील मध्यवर्ती भागातील गल्लीमध्ये रस्त्याची मोठी दुर्दशा झाल्याने अनेक वर्षापासून रस्त्याचे तथा पेव्हर ब्लॉक, गटारी व विविध नागरी सुविधांच्या अभावामुळे त्यावर कुठलेही काम झालेले नाही किंवा रस्ता दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे महिलांनी सकाळी अचानक होणारा त्रासाला कंटाळून गावाचा महत्त्वाचा रस्ता असल्याने रस्त्याला पूर्णपणे पत्रांचे कुंपण करून बंद करण्यात आले व ग्रामपंचायत प्रशासना विरोधात घोषणा देत आंदोलन उभे केले.
रस्त्याचे काम मार्गी लागत नाही तोवर आम्ही हा रस्ता बंद ठेवू अशी ठाम भूमिका व मागणी समस्थ महिलांनी केली आहे.
प्रतिक्रिया..1)
आमचा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता बंद ठेवू आम्हाला रस्त्याचाकंटाळा आला असून चालणे सुद्धा जिगरीचे होत आहे तरी वरिष्ठांनी व संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी.
— वंदनाबाई पाटील व
सुनंदाबाई भंगाळे ग्रामस्थ
प्रतिक्रिया..2)
सदर गावातील रस्ता हा खासदार रक्षाताई खडसे यांच्या निधीतून काँक्रिटीकरण करण्यात येत होते.मात्र पेपर ब्लॉक बसवण्याची मागणी समोर आल्याने त्यासाठी ग्रामनिधी पुरेशी नसल्याने आमदार साहेबांकडे प्रस्तावित आहे निधी मिळाल्यास लवकर काम सुरू करण्यात येईल.