Ankush tv18 news network
Pune
पुणे जुडीसिअरी ही यंत्रणा विशिष्ट वर्ग, पैसे वाले धनिक यांच्यासाठी लवकर लवकर हलते…एका दिवसात दिवाणी दाव्याचा -दस्त रद्द चे अंतिम निकाल –

हा संसदेचा रंड्डी खाना ही देश नावाची आई राजरोज निजते कुबेरा सोबत…

जैन ट्रस्ट व गोखले बिल्डर यांच्यामध्ये मे 2025 व ऑक्टोंबर 2025 मध्ये झालेले दस्त रद्द करण्या करता दाखल दाव्याच्या निकालाचे आहे. दिवाणी स्वरूपाच्या इतका फास्ट न्याय क्वचित कुठ मिळाला असेल. म्हणजे सदर दावा न्यायालयाने फक्त आणि फक्त एका दिवसात निकाली काढला. दाखल विभागाने दिनांक 12/11/2025 दाखल प्रकरण त्याच दिवशी दाखल करून घेवून 14/11/2025 कोर्टाने एकाच हेअरिंग मध्ये 21 पाणी फायनल जजमेंट देत संबंधित दस्त रद्द केले. एकच दिवशी संपूर्ण मॅटर खतम. हा एक जागतिक रेकॉर्ड समजायला पाहिजे. एकीकडे वर्षांनो वर्ष , पिढ्यान् पिढ्या दिवाणी प्रकारात पक्षकार न्यायालयात येत असतात. त्यांना दोन – तीन महिन्यांच्या तारखा दिल्या जातात…. एका व्यक्तीने तर न्यायालयात आत्महत्या केली. त्या सर्व सिस्टम चा भाग म्हणून कधी कधी नको वाटते. हताश वाटते. पण काम करत असताना फार लवकर समजले की ही यंत्रणा विशिष्ट वर्ग, पैसे वाले धनिक यांच्यासाठी लवकर लवकर हलते…. 80-90 वय असलेले पक्षकार कोर्ट मध्ये भेदरलेले चेहरे घेवून फिरत असतात तेंव्हा त्यांच्याकडे पाहवत नाही. सगळ्यांना असा फास्ट न्याय मिळाला तर किती बरे होईल. तेंव्हा न्यायाचे खरे तत्व ” कायदा सर्वांना समान , कायद्यासमोर सर्व समान” हे पाळले जाईल. नाहीतर कवी नामदेव ढसाळ म्हणतात “हा संसदेचा रंड्डी खाना ही देश नावाची आई राजरोज निजते कुबेरा सोबत… तसे चित्र रोजच पहायला मिळते…





