ANKUSH TV18 NEWS NETWORK
मानवत / बातमीदार. { अनिल चव्हाण.}
भगवान श्रीचक्रधर स्वामीं यांनी समाजाला सत्य, अहिंसा, समानता, मानवता या मूल्यांची शिकवण दिली उपप्राचार्य, डॉ.के.जी.हुगे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांनी मत व्यक्त केले.
सविस्तर वृत्त असे की, मानवत येथील के. के. एम महाविद्यालया मध्ये भगवान श्रीचक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के.जी.हुगे, डॉ. प्रा. पंडित लांडगे मूल्यशिक्षण समिती प्रमुख,डॉ शारदा राऊत, प्रा. सविता घनवट, प्रा गजानन अंबेकर, प्रा संजय ढालकरी, प्रा. एम. एम. शेख प्रा सिद्धेश्वर घुमणवाड यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. शारदा राऊत या म्हणाल्या की. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धा मध्ये श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म इसवी सन 1914 मध्ये गुजरात राज्यातील भडोच सध्याचे भरूच येथे झाला. जे भडोचे राजा मल्लदेव यांचे प्रधान होते. त्यांनी श्री. चक्रधर स्वामी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रा. सविता घनवट यांनी श्रीचक्रधर स्वामींच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्याबोलतांनी म्हणाल्या की महानुभव पंथाचा मुख्य उद्देश समाजातील सर्व स्तरातील लोकांना विशेषतः स्त्रिया,शूद्र आणि बहुजन समाजाला मोक्ष प्राप्तीचा समान अधिकार देणे हा होता.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ के.जी हुगे म्हणाले की श्रीचक्रधर स्वामी यांनी सत्य, अहिंसा,समानता, मानवता मूल्यांची शिकवण समाजाला दिली. त्यांनी जी काही मूल्य रुजवली ते मूल्य आपण आत्मसात करून खऱ्या अर्थाने त्यांना वंदन केल्या सारखे होईल असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रल्हाद थोरात तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा विनोद हिबारे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्य महाविद्यालयीन कर्मचारी बांधव उपस्थित होते.