Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » कॅप्टन अशोक खरात याच्या कुकर्मावर-पाच कोटी रुपयांची खंडणी संदर्भात – पोलिसांकडे तक्रार

कॅप्टन अशोक खरात याच्या कुकर्मावर-पाच कोटी रुपयांची खंडणी संदर्भात – पोलिसांकडे तक्रार

ankush tv18 news network

नाशिक येथील स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्या कुकर्मावर पैसे कमविण्यासाठी नामे दिनेश मनाजी परब आणि
राजेंद्र अशोक जासूद या दोन व्यक्तीने पाच कोटी रुपयांची खंडणी अशोक खरात यांच्याकडे मागितल्याच्या संदर्भात त्याने पोलिसांकडे तक्रार डिसेंबर 2025 मध्ये दाखल केली होती..,

नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. त्याच अशोक खरात सोबत शिरुर तालुक्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याच खरातने दोन महिन्यांपुर्वी ‘त्या’ पुढाऱ्यासह एक जणावर नाशिक जिल्ह्यातील वावी पोलिस स्टेशन येथे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अशोककुमार एकनाथ खरात (वय 67, रा. मिरगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांनी वावी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, दिनेश मनाजी परब (रा. मुंबई) याने व्हाट्स अँप कॉल चॅटिंग आणि व्हाईस कॉलद्वारे बोलणे झाले. त्या दरम्यान त्याने खरात यांना सांगितले की, राजेंद्र अशोक जासूद याने तुमचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो माझ्या मोबाईलवर पाठवले आहेत. त्यानंतर दिनेश परब याने ते आक्षेपार्ह फोटो अशोक खरात यांना व्हाट्स अँप वर पाठवले.

त्यानंतर खरात यांनी परब याला व्हाट्स अँप व्हाईस कॉल केला. त्यावेळी परब म्हणाला, जासूद यांच्याकडे अजुनही वेगवेगळ्या महिलांसोबत तुमचे आक्षेपार्ह फोटो आहेत. ते जर सोशल मिडियावर व्हायरल झाले तर तुमची समाजात खुप बदनामी होईल. त्यासाठी आपल्याला जासूद यांच्याशी बोलून विषय मिटवून घ्यावा लागेल असे सांगितले. त्यानंतर खरात यांनी परब याला बदनामी टाळण्यासाठी काय करावे लागेल असे विचारले असता 5 कोटी रुपयात तुमचा विषय आपण मिटवून टाकू असे त्याने सांगितले.

अशोक खरात यांनी मी माझ्या मुलीच्या लग्नामुळे व्यस्त आहे मी एकही रुपया देणार नाही असे परब याला सांगितले. 22 डिसेंबर 2025 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी दिनेश परब याने अशोक खरात यांच्या व्हाट्स अँपवर काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो अशोक खरात यांच्या मोबाईलवर टाकत ते फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फोटो व्हायरल न करण्यासाठी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अशोक खरात यांनी दिनेश मनाजी परब (रा. भायखळा, मुंबई) आणि राजेंद्र अशोक जासूद (रा. पुणे) या दोघांच्या विरोधात वावी पोलिस स्टेशन, नाशिक येथे फिर्याद दाखल केली होती.

असा समजतंय हे दोन व्यक्ती म्हणजे बऱ्याच राजकीय लोकांना पैसा पुरवणे, मोठमोठ्या गाड्या गिफ्ट करत होते…

दौंडच्या भाजपा आमदाराला लँडक्रूझर गिफ्ट
शिरुर हवेलीच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला मर्सिडिज गिफ्ट दिल्याची चर्चा जनमानसात चालू आहेत.
तसेच यांनी लिंगपिसाट भोंदू बाबा खरातला सुद्धा एक गाडी गिफ्ट दिल्याची चर्चा आहे…
आता या भोंदू अशोक खरात या प्रकरणाशी या दोन व्यक्तीच्या नेमका संबंध काय याची देखील चौकशी व्हायला हवी

Please accept YouTube cookies to play this video. By accepting you will be accessing content from YouTube, a service provided by an external third party.

YouTube privacy policy

If you accept this notice, your choice will be saved and the page will refresh.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा