कुटुंबातील पाच जणांचा करंट लागून मृत्यू; ..कुटुंबातील लोकांवर सदोष मानवध आणि वनविभाग कडून गुन्हा दाखल
चिमुकली मृतदेहांजवळ बसून राहिली रडत.
ऑगस्ट 21, 2025 ANKUSH TV18NEWS NETWORK
जळगावः एरंडोल तालुक्यात शेतामधील कुंपणात सोडण्यात आलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून दोन वर्षाचा चिमुकली आश्चर्यकारकरित्या बचावली आहे.
एरंडोल तालुक्यातील वारखेडी गावात एका शेताभोवती तारेचे कुंपण घातले होते. शेतात कोणी शिरु नये म्हणून मालकाने या कुंपणात वीजेचा प्रवाह सोडला होता. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिला, पुरुष आणि लहान मुलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विकास रामलाल पावरा (वय 35), त्यांची पत्नी सुमन पावरा (वय 30), मुलगा पवन (वय 4), मुलगा कवल (वय 3), विकास यांची सासू यांचा समावेश आहे. मात्र, या दुर्घटनेतून दोन वर्षांची चिमुकली आक्षर्यकारकरित्या बचावली आहे.
दुर्गा पावरा असे या लहान मुलीचे नाव आहे. तिचे संपूर्ण कुटुंब कुंपणाला स्पर्श केल्यानंतर शॉक लागून मृत्युमुखी पडले होते. पोलिस याठिकाणी आले तेव्हा घटनास्थळी कुटुंबीयांच्या मृतदेहाजवळ दुर्गा एकटी बसली होती. है. दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. पोलिस कर्मचारी मधुरा पवार यांनी दुर्गाला जवळ घेत तिला मायेची उब देण्याचा प्रयत्न केला होता.
वारखेड़ी गावातील बंडू पाटील यांनी शेतातील मका रानडुक्करांपासून वाचवण्यासाठी शेतीला घातलेल्या तारेच्या कुंपणात करंट सोडला होता. विकास पावरा या मजुराचे कुटुंब याठिकाणी आले तेव्हा त्यांना याची कल्पना नव्हती. शेताच्या बाजूने असलेल्या पायवाटने जात असताना त्यांचा तारेच्या कुंपणाला स्पर्श होताच पाच जणांचा मृत्यू झाला. बराच वेळ या गोष्टीचा कोणाला पत्ता नव्हता. शेतमालक बंडू पाटील सकाळी शेतात गेले तेव्हा कुटुंबीयांच्या दोन वर्षांची दुर्गा कुटुंबीयांच्या मृतदेहापाशी बसून रडतानाचे हृदयद्रावक दृश्य त्यांना दिसले. कुटुंबातील लोकांवर सदोष मानवध आणि वनविभाग कडून गुन्हा दाखल .. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.






