Ankush tv18 news network
Jalgaon
एम.आय.डी.सी.पो.स्टे चे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार नामे- समीर हनिफ काकर वय-22 रा. बिस्मील्ला चौक तांबापुरा जळगांव, याचेवर शरीराविरुध्द चे तसेच मालाविरुध्दचे बरेच गंभीर गुन्हे दाखल होते. त्याची तांवापुरा मेहरुण, जळगांव परीसरात दहशत होती. सदर ईसम हा सामान्य नागरीकांना विनाकारण मारहाण करुन शिवीगाळ करायचा तसेच त्याचे साथीदारांसह खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, जबर दुखापत करणे, घरफोडी, अशा प्रकारचे त्याच्यावर एकुण 13 गुन्हे दाखल होते. त्याचेवर दाखल गुन्हयाचा आलेख पाहता त्याला यापूर्वी 01 वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले होते. त्याचे हद्दपारी नंतर त्याने गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवल्याने त्याच्या गुन्हेगारी कारवायावर आळा बसावा याकरीता त्याचे विरुध्द एम.आय.डी.सी पो.स्टे कडून एम.पी.डी.ए. कायद्यार्तगत स्थानबध्द होणेकामी मा. पोलीस अधीक्षक श्री, महेश्वर रेड्डी सो. यांचे प्रेस प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याचेकडून सदरचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी सो, जळगांव यांचे कडेस पाठविण्यात येवुन दिनांक 04/09/2025 रोजी मा. जिल्हाधिकारी श्री, आयुष प्रसाद सो, यांनी समीर हनिफ ककर यास मध्यवर्ती कारागृह, येरवाडा, पुणे येथे स्थानवघ्द करणेवावत आदेश पारीत केला होता.
सदरचा आदेश प्राप्त झाल्यापासुन समीर काकर हा फारार होता. त्यानुसार दिनांक 24/09/2025 रोजी मा. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड सो. यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार सदर स्थानबध्द ईसम हा पुणे येथे असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्यांनी एम.आय.डी.सी.पो.स्टे चे गुन्हे शोध पथकातील पोलीस.उप. निरीक्षक, चंद्रकांत धनके, पो.ना प्रदीप चौधरी, पो, काँ विशाल कोळी, गणेश ठाकरे अशांचे पथक तयार करुन स्थानबध्द ईसमाचा शोध घेणे कामी पुणे येथे रवाना केले होते. त्यानुसार सदर पथकाने सदर आरोपीताचा पुणे येथे जावून शोध घेवुन त्याच्या दिनांक 25/09/2025 रोजी मुसक्या आवळल्या व त्यास मध्यवर्ती कारागृह, येरवाडा, पुणे, येथे स्थानवंद करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाई हि मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी सो., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, नितीन गणापुरे सो., वांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड, पोलीस. उप. निरीक्षक, चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो. काँ विशाल कोळी, गणेश ठाकरे योगेश घुगे. अशांनी केली आहे.