Ankush tv18 news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
नाना पेठ येथील यंग भोर्डे आळी मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र महोत्सवानिमित्त काल सायंकाळी काली पुत्र कालीचरण महाराज यांनी मंडळाला सदिच्छा भेट देऊन त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली, यावेळी यंग भोर्डे आळी मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष माजी नगरसेवक व शिवसेना पुणे शहर सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांच्या हस्ते कालीपुत्र कालिचरण महाराज यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, सन 1988 पासून अखंड सुरू असलेला नवरात्र सोहळा पुण्याच्या पूर्व भागातील सर्व नागरिकांच्या श्रद्धेचा विषय बनलेला आहे, मंडळ यंदाचे वर्ष 38 वे वर्ष साजरी करत आहे, या नवरात्र मध्ये नऊ दिवस भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, श्री सूक्तपठाण, महाआरती, माता की चौकी, कालीचरण महाराज यांची उपस्थिती असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, माजी नगरसेवक अजय बाप्पू भोसले हे सलग तीस वर्ष मंडळाचे अध्यक्ष पद भूषवत आपली सेवा मातेच्या चरणी अर्पण करीत आहे, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येतो व सायंकाळी ढोल ताशेने देवीची भव्य मिरवणूक नाना पेठ येथून काढण्यात येते, अशी माहिती यंग भोर्डे आळी मित्र मंडळाचे अध्यक्ष व पुणे शहर शिवसेना सह संपर्कप्रमुख अजय बापू भोसले यांनी दिली,