Ankush tv18 news network
कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार: तळोदा – धरती सीड्स, गुजरात यांच्या वतीने तळोदा येथे ‘विश्वजित बीजी II’ (Vishwajeet BG II) कापूस वाणावरील भव्य चर्चासत्र व पीक पाहणी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दलेलपूर शिवारातील रेवानगर रस्त्यालगत तळोदा येथील सुनील श्रीराम कर्णकार, कपिल सुनील कर्णकार यांच्या शेतावर हा कापूस पीक पाहणी कार्यक्रम रविवार, दिनांक ०५/१०/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी धरती सीड्सचे झोनल बिझनेस मॅनेजर हितेंद्र आर पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. व ‘विश्वजित BG II’ कापूस वाणाचे उत्पादन, त्याची गुणवत्ता, कीड आणि रोग व्यवस्थापन याबद्दल सखोल माहिती दिली. शेतकऱ्यांनी थेट शेतात जाऊन या वाणाची पाहणी केली आणि आपल्या समस्या व शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धरती सीड्सचे प्रतिनिधी ललित प्रकाश पाटील, योगेश राजेंद्र पाटील, सुरेश रामचंद्र उगले, शरद सहदेव धुरंधर तसेच नंदुरबार जिल्ह्याचे सेल्स ऑफिसर ज्ञानेश्वर तुळशीराम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेतकरी बांधवांना कापूस पिकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि उत्पादन वाढावे, या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकऱ्यांसाठी कार्यक्रमला आलेले ज्येष्ठ शेतकरी अध्यक्षस्थानी मोहन कृष्णा शेंडे पिपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी
व प्रगतशील शेतकरी जगन्नाथ सखाराम कर्णकार, हिरालाल दगडू कर्णकार दौलत सेना बागुल व दलेरपुर पोलीस पाटील रमेश जादू पाडवी, सरपंच राजु जगन दौलत माळी समाज अध्यक्ष अनिल पुंडलिक मगरे, संजय बबनराव माळी, इ.सह परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते व बियाणे विक्रेते व्यापारी वर्ग यांच्याही सहभाग होता
कार्यक्रमाचे आभार कपिल कर्णकार यांनी मानले कार्यक्रमाच्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात होते