Ankush tv18 news network
सौ. दिपाली कचरे कल्याण पूर्व काटे मानिवली

Mumbai कल्याण -सौ दीपा कचरे
कल्याण पूर्व काटे मानिवली परिसरातील MSCB पॉईंट आजूबाजूच्या घाणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सौ. दिपाली कचरे यांची लेखी मागणी कल्याण पूर्व काटे . ड, प्रभाग चे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे आणि अतिरिक्त कार्यकारीअ भियंता सुनील चंद्रभागा राठोड याना कारवाई बाबद निवेदन देन्यात आले.कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी – काटे मानिवली पूना लिंक रोड येथील स्पर्श हॉस्पिटल खालील MSCB पॉईंट परिसरात प्रचंड कचरा, फुटलेली ड्रेनेज लाईन आणि सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेवर स्थानिक रहिवासी सौ. दिपाली कचरे यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दिलीआहे. 2020 पासून KDMC, MSCB व महावितरण विभागाकडे वेळोवेळी मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या ठिकाणी साचलेले सांडपाणी, दुर्गंधीयुक्त कचरा व घुसिणींचा त्रास यामुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.साई सुदर्शन कॉलनीतील गटार बांधकाम, स्पर्श हॉस्पिटलसमोरील MSCB पॉईंट बंद करून तिथे सुशोभीकरण करणे, आणि सामाजिक उपयोगासाठी वाचनालय उभारणे, अशा मागण्या सौ. कचरे यांनी प्रभाग अधिकारी व MSCB चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सुनील चंद्रभागा राठोड यांच्याकडे पत्रव्यवहारातून केल्या आहेत. मुख्य मागण्या: MSCB पॉईंट कायमचा बंद करून परिसर स्वच्छ व सुंदर करावा फुटलेल्या ड्रेनेजची तात्काळ दुरुस्ती व सांडपाणी व्यवस्थापन करावे दररोज स्वच्छता व कीटकनाशक फवारणी करावी सामाजिक हितासाठी वाचनालय किंवा सार्वजनिक सुविधा उपलब्ध करावी दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी व्हावी RTI अंतर्गत मागितलेली माहिती लेखी स्वरूपात द्यावी
कायद्याचा आधार: म.रा. महानगरपालिका अधिनियम 1949 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 (सार्वजनिक उपद्रव) भारतीय संविधान अनुच्छेद 21 (जीवनाचा हक्क) RTI कायदा 2005 कलम 6 (1) सौ. दिपाली कचरे यांची स्पष्ट भूमिका:
जर वरील तक्रारीवर तात्काळ कार्यवाही झाली नाही, तर माननीय पालकमंत्री, मानवाधिकार आयोग, तसेच उच्च न्यायालयाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल, असे सौ. कचरे यांनी स्पष्ट करत विनंती केली आहे.
स्पर्श हॉस्पिटल mscb व Kdmc कडून बांधकाम करून देण्याबाबत तसेच साई सुदर्शन कॉलनी गटार बांधकाम करून देण्याची मागणी.
कल्याण पूर्व काटे मानिवली . ड, प्रभाग चे सहाय्यक आयुक्त मा. उमेश यमगार साहेब
Tata Power Kalyan Dombivli mscb अतिरिक्त कार्यकारी
अभियंता(additional executive engineer) सुनील चंद्रभागा राठोड.या ट्रान्सफॉर्मरचा बंदिस्त करून देणे व कचऱ्याच्या ठिकाणी सुशोभितकरण संदर्भात सदिच्छा भेट देऊन पत्रव्यवहार मागणी केली