दि.३१/०७/२०२५ रोजी रात्री ०८.३० ते दि.०१/०८/२०२५ रोजी ०८.०० वाजेच्या दरम्यान जळगाव शहरातील एमआयडीसी E सेक्टर मधील आनंद बॅटरी या कंपनीमध्ये बॅटरी बनविण्याकरीता वापरण्यात येणारे ९७,००००/- रु किमतीच्या ३२५ किलो वजनाच्या शिसे धातुच्या नग प्लेटच्या चोरी झाले बाबत अज्ञात चोरट्यांविरुध्द फिर्यादीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे CCTNS गुरन ५६१/२०२५ भारतिय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(३) (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाकरती मा. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोहेकों किरण चौधरी, पोकों नितीन ठाकुर, पोकों गणेश ठाकरे, पोकों राहुल घेटे, पोकों किरण पाटील, पोकों नरेंद्र मोरे अशांचे पथक नेमण्यात आले होते.
