प्रांजल खेवलकर आधीपासून रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिस कोठडीत
एक NGO, नग्न क्लिप्स खेवलकरांचे ‘ती’च्या सोबत शारीरिक संबंध. एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरविरोधात नवी FIR, एका पत्राने कसा गेम झाला? आजच्या पुणे मेट्रोमध्ये हे संपूर्ण प्रकरण” पुण्यातील पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर आता खेवलकरवर पुण्यात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.
प्रांजल खेवलकर यांच्यावर नवा गुन्हा दाखल !
महिलेशी संबंध ठेवताना चोरून व्हिडिओ काढल्याचा आरोप !!
सायबर पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर मागील काही दिवसांपासून रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिस कोठडीत आहे. अशातच आज त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने सायबर पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये महिलेने चोरून आक्षेपार्ह व्हिडिओ काढून त्याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप प्रांजल खेवलकर यांच्यावर केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यावर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळतेय. सहमती नसताना एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेशी संबंध ठेवताना, चोरून व्हिडिओ काढल्याचा महिलेने सायबर पोलिसांकडे आरोप केल्याचे सांगितले जात आहे.







