Ankush tv18 news network
भुसावळ बाजार पो.स्टे. हद्दीत ईसम नामे प्रकाश हुंदामल सारडा रा. नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ, हा त्याचे राहते घरी इंडीया वि. पाकिस्तान क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) खेळवित आहे अशी गोपनिय माहिती प्राप्त झाली.
सदर माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना देवून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पो. स्टाफ पंच यांचे सह जावुन छापा कारवाई केली असता ईसम नामे १) प्रकाश हुदामल कारडा वय ५५ वर्ष रा. सिंधी कॉलनी, भुसावळ, २) रणजीत चत्रभान हंडी वय 35 वर्ष रा. गणपती नगर, जळगांव हे इंडीया वि. पाकिस्तान क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) खेळवितांना मिळुन आल्याने त्यांचे जवळून १,०५,०००/- रु किं. चे ऑनलाईन बेटींग (सट्टा) चे साहित्य जप्त करण्यात आले असुन त्यांचे विरुध्द भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. येथे सीसीटीएनएस गुरनं. ४५८/२०२५ महाराष्ट्र जुगार अधि. कलम ४.५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक सो., जळगांव, डॉ महेश्वर रेड्डी, मा, अपर पोलीस अधीक्षक, श्री अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ उपविभाग, श्री संदीप गावीत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि, शरद बागल, श्रे. पोउपनि, रवि नरवाडे, पोहेको उमाकांत पाटील, पोना/विकास सातदिवे, पोकों राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, मपोको दर्शना पाटील, चा. पोहेको भरत पाटील सर्व स्थागुशा, जळगांव यांनी केली आहे.