Ankush tv18 news network
प्रतिनिधी – निळकंठ वसू
आलेवाडी व परिसरात मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये सर्दी, ताप, डेंगू, वातीचे आजार झपाट्याने वाढू लागले आहेत. या आजारांमुळे प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
दुर्दैव म्हणजे कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कोणीही अधिकारी वा कर्मचारी गावात फिरकताना दिसत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे वरिष्ठ आरोग्य अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आरोग्य विभाग चा एक मलेरिया कर्मचारी गावात येत असतो पण त्यांच्या कडे अपुरी मेडिसिन असतें फार्मलिटी पूर्ण करण्यासाठी ते येतात प्रत्येक घरी एक किंवा दोन गोळया देऊन प्रश्न मिटणार नाही
या पार्श्वभूमीवर छावा संघटनेचे उपजिल्हा प्रमुख श्री. निवृत्ती पाटील वानखडे यांनी आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. “जर लवकरच आरोग्य विभागाने गावात येऊन योग्य उपचार व जनजागृती मोहीम राबवली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा देत प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.