Ankush tv18 news network
Jalgaon
जळगावच्या ‘आर. सी. बाफना ज्वेलर्स’मधील सोन्याची साखळी चोरणारा आंतरराज्यीय आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात चोरीच्या सोन्याची बनवलेली ‘लगड’ हस्तगत.
जळगाव शहरातील सुभाष चौकातील प्रतिष्ठित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’मध्ये ग्राहकाच्या बहाण्याने येऊन सोन्याची चैन चोरणाऱ्या सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून जेरबंद केले आहे. आरोपीने अटकेपासून वाचण्यासाठी चोरलेल्या सोन्याच्या साखळीची लगड (Gold Ingot) तयार केली होती. तीदेखील पोलिसांनी हस्तगत केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी : दिनांक ०९/०१/२०२६ रोजी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स (नयनतारा अँड सन्स) येथे एका अज्ञात इसमाने सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला होता. सेल्समनला बोलण्यात गुंतवून त्याने १९.३५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (अंदाजे किंमत २.४९.६१५/- रुपये) चोरून नेली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (a) अन्वये गुन्हा रजि. नं. ०९/२०२६ दाखल करण्यात आला होता.
तपास प्रकिया व हस्तगत मुद्देमाल पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला. संशयित आरोपी हा तेलंगणा राज्यातील सायबरबाद परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यावर, पथकाने तेथे जाऊन भास्कर किसन बानोथ (वय २२ वर्षे, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) याला ताब्यात घेतले.
आरोपोचो सखोल चौकशी केली असता, त्याने ओळख पटू नये आणि चोरीचा माल खपवता यावा या उद्देशाने चोरलेल्या साखळीला वितळवून त्याची सोन्याची लगड बनवली असल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून सदरची लगड हस्तगत केली असून, गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.
पुढील तपास : स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले व पोलीस हवालदार बोरसे हे करीत आहेत. विशेष कामगिरी करणारे पथक (LCB) सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखालीः श्री. राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, LCB) पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे पोह. प्रविण भालेराव, पोह. मुरलीधर धनगर, पोकों सिद्धेश्वर डापकर आणि चापोकों महेश सोमवंशी यांनी केली आहे.





