Ankush tv18 news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार 15 जणांना आरोग्य खाते मध्ये नियुक्त्या, आरोग्य सेवा मंडळ पुणे उपसंचालक डॉ भगवान पवार यांचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष बबलू सोळंकी यांच्या हस्ते सन्मान
उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ पुणे यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार श्रीमती सुनिता पूनम साळुंखे (तत्कालीन सफाईगार) प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथे दिनांक 31 8 2022 रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे अर्जानुसार लाडपागे वारस हक्काच्या तरतुदीनुसार त्यांचा मुलगा निलेश पूनम साळुंके पुरुष परिचर या पदावर घेण्यासाठी त्याचबरोबर 15 जणांना आरोग्य सेवा पुणे मंडळ उपसंचालक डॉ, भगवान पवार यांच्या हस्ते 15 जणांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले,
लाडपागे समितीच्या शिफारशीच्या अनुसार वारस हक्क ज्यांना आहे त्यांच्या वारसदार उमेदवारांना त्यांना नोकरी देणे बंधनकारक होतं बरेच दिवस हे प्रकरण आरोग्य खाते मध्ये प्रलंबित होते त्याचे पाठपुरावा करून त्यांना नोकरीचे आदेश देण्यात आले अशा 15 जणांना (अपॉइंटमेंट लेटर) नियुक्तीपत्र आरोग्य सेवा मंडळ पुणे उपसंचालक डॉ भगवान पवार यांच्या हस्ते देण्यात आले, त्यानिमित्त अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस सातारा जिल्हा अध्यक्ष बबलू साळुंके यांच्या हस्ते डॉ भगवान पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,
पुढच्या महिन्यात दिवाळी असल्याने ज्यांच्या नियुक्ती झाली त्यांच्या घरी गोड दिवाळी साजरी व्हावी हीच आशा करतो डॉ भगवान पवार उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ पुणे, यावेळी बबलू सोळंकी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस सातारा जिल्हा अध्यक्ष, व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जिल्हा सातारा उपाध्यक्ष, शैलेंद्र चव्हाण, पुनम साळुंखे विश्व वाल्मिकी सेना राष्ट्रीय अध्यक्ष, सुनिता साळुंके, आदी यावेळी उपस्थित होते,