Home » ताज्या बातम्या » आमदार,जिल्हाधिकारी,प्रशासक तथा प्रांताधिकारी यांची दिशाभूल ?

आमदार,जिल्हाधिकारी,प्रशासक तथा प्रांताधिकारी यांची दिशाभूल  ?

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

आमदार,जिल्हाधिकारी,प्रशासक तथा प्रांताधिकारी यांची दिशाभूल  ?

यावल दि.३०   –  ५६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम विरुद्ध दिशेने सुरू झाले आहे कामाचे सर्व उपांगाच्या कामाच्या ठिकाणी माहितीचा फलक योग्य त्या साईज मध्ये लावलेला नसल्याने संबंधित ठेकेदार हा पाणीपुरवठा प्रकल्पाचे सर्व काम त्याच्या सोयीनुसार आणि मर्जीनुसार करीत आहे, या कोट्यावधी रुपयाच्या कामांमध्ये जिल्हाधिकारी जळगाव आमदार अमोलभाऊ जावळे नगरपरिषदेचे प्रशासक तथा फैजपूर भाग प्रांताधिकारी यांची दिशाभूल करीत यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हे ठेकेदाराला तात्काळ कामाच्या बिलाचा धनादेश या ८ दिवसात देणार असल्याची यावल तालुक्यात चर्चा आहे.  नगरोत्थान अभियानांतर्गत यावल नगर परिषदेचा पाणीपुरवठा प्रकल्प नगर परिषद प्रशासन संचालनालयामार्फत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे सादर करण्यात आला होता या प्रकल्पास मुख्य अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,नाशिक विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारशीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

या प्रकल्पातील उपांगे व त्यांचे किमतीचे विवरण पुढील प्रमाणे आहे. यात प्रामुख्याने सर्वेक्षणाचे काम, इनटेक विहीर,इंनटेक पाईप, पंप हाऊस विहीर,ॲप्रोच ब्रिज,ॲप्रोच बंड,ॲप्रोच रस्ता, कच्चे पाणी पंपिंग यंत्रणा, कच्च्या पाण्याची मुख्य वाहिनी,प्री- सेटिंग टॅंक,जलशुद्धीकरण केंद्र,शुद्ध पाणी मुख्य वाहिनी,शुद्ध पाणी पंपिंग यंत्रणा,पूर्ण प्ररसारण प्रणाली, वितरण प्रणाली,रस्ता पुन्हा बसवणे, साने गुरुजी शाळेतील जुन्या RCC ESR ची दुरुस्ती.सौर ऊर्जा प्रकल्प,ट्रायल बेसिस वर योजना चालवणे इत्यादी ५६ कोटी रुपयाची कामे ठेकेदाराने कार्यादेश मिळाल्या पासून १८ महिन्याच्या कालावधीत ( २२/११/२०२६ पर्यंत ) पूर्ण करावयाची आहे असे मंजूर प्रस्तावात नमूद आहे.
यावल नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी कार्यारंभ आदेश देताना एकूण दिलेल्या १२ अटी शर्तीनुसार ठेकेदार काम करीत नसल्याची प्रत्यक्ष खात्री कोण करीत आहे याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. कामासाठी वापरण्यात येणारे साहित्याचे गुणवत्ता चाचणी अहवाल वेळेवर सादर केले जात आहेत का.?
ठेकेदाराने सदर कामाबाबतचा वारचार्ट व कामावर नियुक्त तांत्रिक कर्मचारी यांचा सविस्तर तपशील नगरपरिषद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्याकडे ८ दिवसात सादर केला आहे का..?
कामावरील कामगारांचे हजेरी पत्रक विमा भरण्याची कागदपत्रे वेळोवेळी नगर परिषदेकडे सादर करण्यात आली आहे का.? इत्यादी बाबींची तसेच कामाचा शुभारंभ हा शेळगाव बॅरेज बॅरेज पासून ( पाणी घेणार आहे त्या ठिकाणापासून ) पाहिजे की यावल शहरापासून हा संबंधितांना संशोधनाचा विषय आहे.
यावल शहरापासून बोरावल रस्त्याने शेळगाव पर्यंत रस्त्याच्या साईट पट्टीला लागून ५ ते ६ फूट खोल खोदकाम करून अंदाजे ८ किलोमीटर अंतरापर्यंत शेळगाव मॅरेज पर्यंत पाईपलाईन टाकण्याचे जे काम सुरू केली ते काम सुरू करण्याच्या आधी ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे जे काम सुरू केले त्यासाठी ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि शेतकऱ्यांकडून तशी अधिकृतरित्या परवानगी घेतली आहे किंवा कशी याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हे जिल्हाधिकारी जळगाव,आमदार अमोलभाऊ जावळे, तसेच यावल नगर परिषदेचे प्रशासक तथा फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांची दिशाभूल करून ठेकेदाराला पेमेंट देणार असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा