Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » -आतिष जितेंद्र पोथीवाल गणेश लक्ष्मण कोळी ना गुन्हयाकामी अटक चोरी गेलेले दुचाकी वाहन एमआयडीसी पोस्टे कडून हस्तगत.

-आतिष जितेंद्र पोथीवाल गणेश लक्ष्मण कोळी ना गुन्हयाकामी अटक चोरी गेलेले दुचाकी वाहन एमआयडीसी पोस्टे कडून हस्तगत.

Trending Photos

ankush tv18 news network

जळगाव तालुक्यातील धानोरा खु येथे राहणारे फिर्यादी शालिक पाटील यांचे मालकीची दुचाकी हिरोहोंडा सुपर स्पेंडर वाहन MH१९AK०२०७ सह जळगाव शहातील काशिनाथ चौक भागात कामकाजासाठी आले असता दुचाकी वाहन लावुन सामाना खरेदीसाठी गेले असता परते आले असता त्यांचे पार्किंग केलेल्या ठिकाणी दुचाकी वाहन दिसुन न आल्याने सदर वाहनाची अज्ञात ईसमाने चोरी केल्याची खात्री झाल्याने एमाआयडीसी पोलीस स्टेशन गुरन ६६/२०२६ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुप्त बातमिदारांकडून गोपनिय बातमी काढून व यावल पोलीस स्टेशनचे पोनि रंगनाथ धारबळे व पोकों परमेश्वर जाधव व पोकॉ राजेंद्र पाटील यांच्या मदतीने चोरी करणारे आरोपी निष्पण करुन सदर आरोपीतास दि.०१/०२/२०२६ रोजी ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचे नाव आतिष जितेंद्र पोथीवाल रा काचंन नगर जळगाव याने दुचाकी चोरीची कबुली देवुन त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार गणेश लक्ष्मण कोळी रा साकेगाव ता भुसावळ यांच्या सोबत केलेचे सांगितल्याने त्याचे साथीदार ताब्यात घेवुन त्यांच्याकडून चोरी केलेले दुचाकी वाहन हरोहोंडा सुपर स्पेंडर वाहन MH१९AK०२०७ हस्तगत करण्यात आलेली आहे.

सदर आरोपी नामे १) आतिष जितेंद्र पोथीवाल रा काचंन नगर जळगाव, २) गणेश लक्ष्मण कोळी रा साकेगाव ता भुसावळ यांना गुन्हयाकामी अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

सदरची कामगिरी एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव चे पोनि बबन आव्हाड यांनी आवश्यक सूचना देवुन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह गिरीश पाटील, पोकों गणेश ठाकरे, पोकों राहुल घेटे, पोकों योगेश घुगे अशांनी केली आहे.

सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा.नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा