Ankush tv18 news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चपल फेकण्याच्या निषेधार्ह प्रकाराच्या विरोधात आजाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य व युवा मोर्चा तर्फे आज पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची कार्यालयावर भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे या घटनेचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध नोंदविण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकाराने न्यायव्यवस्था व संविधानाचा अपमान झाल्याचे नमूद करून देशातील लोकशाही आणि सामाजिक सौहार्द धोक्यात आणण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या प्रसंगी
डॉ. मानसी पवार – प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी
हाजी जुबेर मेमन – प्रदेश महासचिव
सुलतान शाह – महाराष्ट्र युवक अध्यक्ष
राजू शिवाजी कांबळे – पुणे जिल्हाध्यक्ष, पश्चिम विभाग
सैफ शेख – जिल्हाध्यक्ष, युवा आजाद समाज पार्टी,
किशोर निकाळजे – पुणे जिल्हा उपाध्यक्ष, पश्चिम विभाग
सलीम सलगर – पुणे जिल्हा महासचिव, पश्चिम विभाग
परशुराम कुंभार – जिल्हा सचिव, युवा मोर्चा, आजाद समाज पार्टी
संजय कांबळे – पुणे शहर अध्यक्ष
सारिका सलगर – पुणे शहर उपाध्यक्ष
सतेज गायकवाड – पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष
सोमनाथ जाधव – पुणे जिल्हाध्यक्ष, पूर्व विभाग
तसेच आजाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला.
पक्षाने शासनाकडे खालील मागण्या केल्या:
1️⃣ सर्वोच्च न्यायालयातील या गंभीर घटनेतील आरोपींवर देशद्रोह व न्यायालयीन मानहानीचे गुन्हे दाखल करावेत.
2️⃣ न्यायालयीन परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी.
3️⃣ न्यायसंस्था व संविधान संस्थांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईसाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी लागू कराव्यात.
“न्यायसंस्थेवर झालेला हल्ला हा राष्ट्राच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे,” असे या वेळी पक्षनेत्यांनी ठामपणे सांगितले.
आजाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य व युवा मोर्चा यापुढेही संविधान व न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी संघर्ष करत राहील, असे या निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले,