Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » आगारप्रमुख दिलीप महाजन यांना भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी थेट जाब विचारत ठणकावले :

आगारप्रमुख दिलीप महाजन यांना भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी थेट जाब विचारत ठणकावले :

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

यावल एस.टी.आगारात कर्मचाऱ्यावरील अन्यायाबाबत भीम आर्मीने आगार प्रमुख याची घेतली भेट.

Ankush tv18 news network

यावल दि.१८ ( सुरेश पाटील ) यावल एस.टी. आगारातील कर्मचारी हे शांतपणे आपले दैनंदिन कामकाज करत असले

तरी, मागच्या काही महिन्यांपासून इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असल्याने भीम आर्मी जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आगार प्रमुख यांची भेट घेऊन चर्चा केली.

व्यवस्थापनाकडून होणारी मनमानी,जातीपातीवर आधारित अपमानास्पद वागणूक आणि सततचा मानसिक त्रास यामुळे कर्मचारी त्रस्त झाले होते.अखेर या सर्व तक्रारींचा भांडाफोड करण्यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन मैदानात उतरली.
१७ सप्टेंबरच्या दुपारी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते यावल आगारात दाखल झाले. अचानक एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने आगारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कर्मचाऱ्यांमध्ये एकीकडे दिलासा तर दुसरीकडे भीतीचे भाव दिसून आले.सपकाळे यांनी आगारप्रमुख दिलीप महाजन यांना थेट जाब विचारत ठणकावले : “संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत.जातीच्या आधारावर भेदभाव करणे हा गंभीर अपमान आहे.शासन सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने अशी वागणूक देणे लाजिरवाणे आहे.”त्यांनी थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.अनेक कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर कबुली दिली की — “आमच्यावर मनमानी बदल्या, सुट्ट्यांवर अडथळे,जातिवाचक भाष्य आणि शिस्तभंगाच्या धमक्या दिल्या जातात.”या सगळ्या पार्श्वभूमीवर सपकाळे यांनी स्पष्ट इशारा दिला “पुढे कोणत्याही कर्मचाऱ्याला मानसिक त्रास दिला तर गाठ थेट भीम आर्मीशी आहे. अन्याय करणाऱ्यांना सोडले जाणार नाही.” यामुळे दीर्घकाळ भीती खाली काम करणाऱ्याकर्मचाऱ्यांना धीर आला.अनेकांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपली मते मोकळेपणाने व्यक्त केली.
भीम आर्मीने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. डेपो मॅनेजर दिलीप महाजन यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल होणार असून, त्यांची बदली व निलंबनाची मागणी केली जाणार आहे. जर यावर तातडीने कारवाई झाली नाही, तर आंदोलनात्मक मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान जिल्हा संघटक संदीप सपकाळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर, तालुका उपाध्यक्ष आकाश बिऱ्हाडे, बबलू गजरे,चंदू पारधे,सतीश अडकमोल, गौरव सोनवणे, राजू तडवी, युनुस तडवी,प्रदीप वानखेडे,राजू पिंजारी, मिलिंद जंजाळे,फिरोज तडवी जिल्हा सचिव,सचिन वानखेडे, करण अडकमोल,सोहन गजरे, आशिष तायडे,योगेश भील,करण मोरे यांसह कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
ही घटना केवळ यावल आगारापुरती मर्यादित राहिली नाही. “कर्मचाऱ्यांच्या अधिकारांवर कुणी गदा आणल्यास सामाजिक संघटना ठामपणे उभ्या राहतील,” असा स्पष्ट संदेश भीम आर्मीने दिला आहे. संविधानिक मूल्यांशी छेडछाड झाल्यास रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी दाखवून, भीम आर्मीने पुन्हा एकदा आपली सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली आहे…

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा