ANKUSH TV18NEWS NETWORK
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांची ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचालित माहिती अधिकार नागरिक समूह आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशन प्रसंगी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा सन्मान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ४.०० वाजता प्रदान करण्यात येणार आहे.
माहिती अधिकाराच्या माध्यमातून समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, आर्थिक, शासकीय, पर्यावरणीय व सामाजिक समस्यांवर त्यांनी केलेल्या कार्याबद्दल हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळत आहे. या गौरवशाली यादीत दीपक पाचपुते यांचे नाव समाविष्ट झाल्यामुळे अहिल्यानगरच्या कार्यकर्त्यांत आनंद व अभिमानाचे वातावरण आहे.
या पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील पारदर्शक शासन व सामाजिक विकासाच्या कार्यात पाचपुते यांचे योगदान अधोरेखित झाले असून, समाजकारण व सामाजिक कार्याच्या क्षेत्रात राज्यस्तरावर नावलौकिक मिळविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. अहिल्यानगर व परिसरातील नागरिकांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याची पावती या पुरस्काराच्या रूपाने मिळाल्याने स्थानिक पातळीवर नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.