Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » असोदा मार्ग मधील मध्य रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या पुलाला पडले भगदाड. -जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक याना लेखी ठेकेदारां विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देणेची नागरिकांची मागणी

असोदा मार्ग मधील मध्य रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या पुलाला पडले भगदाड. -जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक याना लेखी  ठेकेदारां विरुद्ध  फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देणेची नागरिकांची मागणी

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

Ankusht tv19 news network

####    लवकरच मध्य रेल्वे जळगाव व भुसावल रेल्वे स्थानकात दरम्यानचा पूल कोसळणार !   

जळगाव जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक याना लेखी  ठेकेदारां विरुद्ध  फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देणेची नागरिकांची मागणी   –

 

Ayush PrasadDistrict Collector   Jalgaon collector   District Collector Office, JalgaonMobil no. 8275970672
Ayush Prasad District Collector Jalgaon collector District Collector Office, Jalgaon Mobil no. 8275970672

मध्य रेल्वेच्या भुसावळ जळगाव रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या दोन वर्षाच्या आत पुलाला मोठा भगदाड!

####   33 कोटी रुपये मध्ये भ्रष्टाचार, निष्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून बोगस पूल तयार  !

जळगाव – आसोदा मार्ग अविरत रहदारीचा मार्ग आहे. या रस्त्याच्या दुतर्फा जळगाव शहरात दाट लोकवस्ती वसलेली आहे. अशा प्रतिकूल स्थितीत या पुलाचे काम हाती घेण्यात आले आणि अगदी दोनच वर्षांत ते पूर्ण करण्यात आले. ‘महारेल’ने प्रचंड वेगात हे काम पूर्ण केले आहे.    मध्य रेल्वेच्या भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांदरम्यान जळगाव- आसोदा मार्गावर या उड्डाणपुलाचे काम  २०२२मध्ये पुलाच्या कामाला सुरवात करण्यात आली.

जळगाव व आसोदा मार्गावर ७०० मीटर अंतर असलेल्या या पुलासोबत समांतर सेवारस्तेही तयार करण्यात येत आहे. ३३ कोटी रुपये खर्चून पुलाचे काम केला आहे.

जळगाव  येथील आसोदा रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाचे काम निकृष्ट झाले आहे. जवळपास ३३ कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या पुलाला मधोमध खड्डा पडला आहे. मोठा गाजावाजा करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या पुलाची अल्पावधीत झालेली ही अवस्था चर्चेचा विषय बनला आहे.

मध्य रेल्वेच्या इगतपुरी भुसावळ विभागावरील जळगाव रेल्वे स्थानक आणि भादली रेल्वे स्थानकादरम्यान महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल) द्वारे असोदा रेल्वे उड्डाण पुलाचे काम करण्यात आले आहे.

हा असोदा रेल्वे गेटवरील पुल सातशे मीटर लांबिचा असून हा पूल दोन लेनमध्ये तयार करण्यात आला आहे. यासाठी जवळपास ३३ कोटी रुपयांच्या निधी खर्च करण्यात आला आहे. मे २०२४ मध्ये हा पूल रहदारीसाठी खुला करण्यात आला.

रस्त्याच्या मधोमध पडला खड्डा

असोदा उड्डाण पूल रहदारीस खूला करुन जवळपास दीड वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र, उल्पावधीतच या पुलाच्या कामाचे पितळ उघडे झाले आहे. पुलाच्या असोदाकडे जाणाऱ्या उतारावर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याचे चित्र आहे. हा रस्ता खचल्याची स्थिती असून सतत वाहणाऱ्या वहनांमुळे खड्डा वाढत आहे. दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी हा खड्डा पडला आहे. मात्र, उशीरापर्यंत याबाबत प्रशासनाचे कुठलीही उपाययोजना केली आहे. किंवा खड्ड्याच्या सभोवताली बॅरेकेट्स लवण्याची तसदी देखील प्रशासनाने प्रशासनाची भुमिका व कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अश्या देण्यांत आल्या होत्या सुविधा

आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणेद्वारे या पुलाचे काम करण्यात आले. ‘महारेल’ने क्रॅश बॅरियर या आधुनिक प्रणालीद्वारे पुलांचे काम सुरु केले आहे.   सुरक्षेची तडजोड न करता सुविधांची पूर्तता, तपासणी व दुरुस्तीचे काम, काही यंत्रसामग्री बदलण्याचे काम, उत्तम असेंब्ली या बाबींचा प्रणालीत समावेश आहे. स्टेनलेस स्टील (३ टीयर)च्या आधुनिक युनिलिटी डक्टसह एकत्रित याद्वारे करण्यात आले आहे.

– रात्रीच्या चांगल्या दृष्यमानतेसाठी व दूरस्थपणे नियंत्रित थीम- आधारित एलईडी

– सजावटीच्या कमानींसाठी उड्डाणपुलावर एलईडी पथदिव्यांची व्यवस्था

– पुलाच्या सजावटीसाठी ‘फोर कोटींग’ रंगकाम

– पुलाच्या दोन्ही बाजूंनी समर्पित सेवारस्त्यांची सुविधा

– वेग कमी न करता रेल्वेची मुक्त वाहतूक शक्य

– रेल्वे फाटकमुक्तीच्या दिशेने आणखी एक टप्पा, गर्दीमुक्त वाहतूक

– या पुलाच्या कामामुळे जळगाव- आसोदा- भादली रस्त्यावरील वाहनधारकांची होणार सुविधा

– या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे प्रमाण अधिक असल्याने रस्तेवाहतूक करणाऱ्यांचा वेळ पुलामुळे वाचणार आहे

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा