Ankush tv18 news network
Jalgaon
, सत्रासेन ते चोपडा जाणा-या रोडने दोन इसम मोटार सायकलवर गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक करणार असलेबाबत खात्रीशीर बातमी.
सत्रासेन ते चोपडा जाणा-या रोडवर वाहनाची तपासणी करुन अवैध गांजा वाहतुक करणा-या मोटार सायकल वरील दोन्ही इसमास ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अनुक्रमे १) अविनाश साहेबराव ढिवरे वय-२६ रा-खोकरी पो.स्ट धवली, ता-वरला, जिल्हा बडवाणी, २) रोशन साहेबराव ढिवरे वय ३१ रा-खोकरी, पो.स्ट धवली, ता.वरला, जिल्हा बडवाणी असे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.१) १,७८,६४०/- रु.कि.चा ०८ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा,२) ४०,०००/- रु.किं.ची एक होन्डा कंपणीची मोटार सायकल क्रमांक MP-४६-MV-२९५१३) १०,०००/- रु.किं.चा एक मोबाईल फोन असा एकुन २,२८६४०/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचे विरुध्द चोपडा ग्रामीण पो.स्टे ला CCTNS NO ०२५६/२०२५ NDPS अँक्ट २० (ब), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही.मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा श्रीमती कविता नेरकर अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परीमंडळ, मा. अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग, मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा जळगांव मा. श्री मधुकर साळवे चोपडा शहर पो.स्टे चार्ज चोपडा ग्रामिण पो.स्टे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.सदरची कारवाई स.पो.नि शेषराव नितनवरे नेम-चोपडा ग्रामिण पो.स्टे व पोउ.निरी.श्री जितेंद्र वल्टे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोह. विलेश सोनवणे, पोकॉ. रावसाहेब पाटील, सर्व नेमणुक. स्था.गु.शा जळगांव तसेच चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोह. राकेश पाटील, पो.कॉ. मनेष गावीत, पोकॉ. प्रमोद पवार, पोकॉ. तिरुपती खांडेकर, पोकॉ किरण पारधी अशांनी केली आहे.