ANKUSH TV18NEWS NETWORK
JALGAON – एक ईसम हा मच्छीबाजार, तांबापुरा, जळगाव परीसरातील एका घरामध्ये गांजा बागळुन त्याची चोरटी विक्री करीत आहे. सदर बातमीप्रमाणे, त्यांनी सपोनि. अनिल वाघ, पोउपनि राहुल तायडे, पो. उपनि, चंद्रकांत धनके पोहेकॉ किरण चौधरी, पोहेकॉ. प्रमोद लाडवंजारी, पो.काँ. गणेश ठाकरे, पोकॉ. किरण पाटील, पोकॉ. नितीन ठाकुर, पोकॉ. राहुल घेटे, पोकॉ. योगेश घुगे, अशांचे पथक तयार करुन त्यांना अवैध गांजावीक्री करणा-या इसमावर कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर पथकाने गांजा विक्री करणा-या ईसमाचा शोध घेत असतांना तो मच्छी बाजार तांबापुरा येथील घरामध्ये असल्याबाबत माहीती मिळाल्याने सदर ईसमास पळुन न जाण्याची संधी न देता त्यास चारही बाजुने सापळा रचुन मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे एका घराचे बाहेरुन आवाज दिला असता एक इसम बाहेर आल्याने त्यास त्याचे नाव-गाव विचारता त्याने त्याचे नाव मेहमुद शेख मेहबुब वय 59 वर्षए व्यवसाय मजुरी रा. मच्छीबाजार तांबापुरा जळगाव असे सांगीतले. त्यास मिळालेल्या बातमीबाबत विचारपुस करुन शहानिशा केली असता त्याचे घरात 93,150/- रुपये किंमतीचा गांजा एकुन वजन 15 किलो 525 ग्रॅम दोन गोण्यांमध्ये मिळुन आल्याने स.पो.नि अनिल वाघ यांनी शासकीय पंच, वजनकाटा धारक, फॉरेन्सीक व्हॅन, यांना घटनास्थळी पाचरण करुन संशईत ईसमासोबत मुद्देमाल जप्त केला आहे. पो.कॉ.गणेश ठाकरे यांचे फिर्यादीवरुन एनडीपीएस कलम 8(क), 20(ब), (II) ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गांजा बाळगणा-यास दिनांक 02/09/2025 रोजी अटक करुन त्यास मा. न्यायालयाने हजर केले असता दिनांक 04/09/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि, राहुल तायडे, पोकों, चेतन पाटील हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री, महेश्वर रेड्डी सो, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे सो, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अवैधरीत्या कोणी अंमली पदार्थाची विक्री करीत असल्यास त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तात्काळ खबर द्यावी. खबर देणा-याचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल.