Ankush tv19 news network
नागपूर : जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला जामीन मंजूर केल्यावर सहा दिवसांनी सुटका झाली. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सकाळी ११:३० च्या सुमारास त्याची सुटका झाली. गवळी विमानाने मुंबईला रवाना झाला. १८ वर्षांनंतर गवळीला जामीन मंजूर झाला.
मागील गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला व त्यासंदर्भातील अटी-शर्ती सत्र न्यायालय निश्चित करेल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर सुटी मुंबई सत्र न्यायालयातून अटी-शर्ती निश्चित होऊ शकल्या नव्हत्या. या प्रक्रियेनंतर जामिनासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. त्याची प्रत नागपूर कारागृहात आल्यावर गवळीची सुटका झाली. पोलिसांनी त्यास नागपूरच्या विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला. गवळीवर २००६ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटक झाली होती. त्यानंतर २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा आणि १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. या निकालाविरोधात त्यांने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते,
मात्र २०१९ मध्ये उच्च न्यायालयानेही त्यांना दिलेली शिक्षा कायम ठेवली. ‘डॅडी’ म्हणून लोकप्रिय असलेल्या गवळीने गुन्हेगारी जगातून राजकारणात प्रवेश केला आणि विधानसभेतही पोहोचला, त्यांने स्वतःचा पक्ष ‘अखिल भारतीय सेना’ स्थापन केला होता. पण गुन्हेगारी कृत्यांमुळे तो जास्त काळ तुरुंगातच राहिला दरम्यान, वय आणि आरोग्याच्या कारणास्तव गवळीने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने त्याची याचिका मंजूर करत सत्र न्यायालयाने ठरवलेल्या अटींवर जामीन मंजूर केला. या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे.