Ankush tv18News network
अकोट प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे अधिष्ठाता पदाची प्रभारी जबाबदारी श्री. संजय सोनुने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे औचित्य साधून अकोट येथून विशेष दौऱ्यावर आलेल्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट देऊन त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. शंकराव वाकोडे, उपजिल्हा प्रमुख श्री. निवृत्ती पाटील वानखडे, अकोट पत्रकार संघटनेचे प्रतिनिधी श्री. निळकंठ वसू पाटील, पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. रामराव राठोड, तसेच छावा संघटनेचे पदाधिकारी श्री. अजय पाटील उपस्थित होते.
नवीन अधिष्ठातापदाच्या जबाबदारीबाबत श्री. संजय सोनुने यांचे अभिनंदन करताना उपस्थित मान्यवरांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील रुग्णसेवा, शिक्षण व व्यवस्थापन अधिक सक्षम आणि कार्यक्षम होईल.
कार्यक्रम दरम्यान सौहार्दाचे वातावरण होते आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय विषयांवर चर्चा झालीपदाधिकारी एकनाथ टाले, केतन केदार हे हजर होते