ANKUSH TV18 NEWS NETWORK
अकोट, दि. 10 – अकोट अकोला महामार्गावरील देवरी फाटा ते शेगाव रोड या मुख्य मार्गावर दोन महिन्यांपूर्वीच करण्यात आलेले डांबरीकरण पावसात वाहून गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित अकोट येथील सब ठेकेदाराने केलेल्या कामाच्या निकृष्ट गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, याची चौकशी करून जबाबदार ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
मुख्य महामार्ग असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, अपघातांचा धोका वाढला आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. योगेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असून यामध्ये ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात यावी. नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या अशा कामांना कुठलीही माफी देता येणार नाही. या रस्त्याचे तातडीने दुरुस्ती करून दर्जेदार काम करण्यात यावे.”
नागरिकांनी देखील याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, लवकरच योग्य पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.